Gulabrao Patil : नुकतेच मंत्रिमंडळाचे खाते वाटप पार पडले आहे. मात्र, मंत्रीमंडळाच्या खातेवाटपांनंतर सगळीकडूनच जोरदार टीकाटिप्पणी होत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडूनही ‘सामना’ मधून खातेवाटपावर टीका करण्यात आली होती.
संजय राऊत यांनी सामनामधून भाजप तुपाशी तर शिंदे गट उपाशी, अशी टीका केली होती. या टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उंदराला सापडली चिंधी इकडे ठेवू का तिकडे ठेवू अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टोला लगावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, खाते कुणाला कोणते दिले यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्याची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. मंत्र्याची जबाबदारी ही प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची जबाबदारी असते.
तसेच, खाते वाटप करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल. मात्र, उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू की तिकडे ठेवू, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेता संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
पुढे, गुलाबराव पाटील यांना खातेवाटपात जे खाते मिळालं आहे त्यावर समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मला आधी जे खातं होतं तेच पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले. त्यामुळे आनंद झाला.
माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत ३४ हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे यातून गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
यासोबतच पत्रकारांनी खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो? असा प्रश्न त्यांना विचारला. यावर चष्मा तर मी पण घातला आहे, असे उत्तर त्यांनी दिले. यावरून उपस्थित लोक हसायला लागले.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : शिंंदे गटाला फक्त २० टक्के निधी तर भाजपला ८० टक्के निधी, खरी सत्ता भाजपचीच
सामान्यांचे आबा! ‘या’ चार निर्णयांमुळे आर आर पाटलांनी लोकांच्या मनात वेगळं घर केलं होतं
Panchand meghwal : दलितांवर होणारे अत्याचार पाहून काँग्रेस आमदाराचे मन दुखावले, दिला राजीनामा
Gujrat riots : गुजरात दंगल: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची 15 ऑगस्टला सुटका