Gulabrao Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यामुळे राज्यात महवकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आले.
सत्तांतरापासूनच राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करणे सुरु आहे. अशातच अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर ५० खोके घेतले असल्याचा आरोप केला होता.
याच मुद्द्यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणांवर चांगलीच टोलेबाजी केली. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्याकरिता काही लोकं सोडले गेलेलं आहेत की, जा यांना बदनाम करा. “बदनाम तो वो होते है जो बदनामीसे डरते है, हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है,” असे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ३५ वर्षे ज्या संघटनेमध्ये घातली त्या संघटनेला वाचवण्याकरीता हा पवित्रा आम्ही घेतलेला आहे. या शिवसेनेला कित्येक लोक सोडून गेलेत पण आम्ही सोडून गेलो नाही. आम्ही तिला पक्क पकडून ठेवलं. निवडणूक जिंकलो काय, निवडणूक हरलो काय, पोलिसांनी पकडलं काय, पोलिसांनी सोडलं काय तरी खांद्यावरचा भगवा झेंडा आम्ही खाली पडू दिला नाही.
आता तीन-तीन चार-चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून इकडे आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. उलट शिवसेना वाचवण्याकरिता, बाळासाहेबांचे विचार वाचवण्याकरिता हा उठाव आम्ही केलेला आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. ‘
ते जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. “शंभर दिवस हिजड्यांसारखं जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखं जगा,” असे म्हणत गुलाबराव पाटलांनी या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केली.
महत्वाच्या बातम्या
shivsena : शिंदेंचं सरकार कोसळणार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मोठी अपडेट
‘…तर राज्यपालांना महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावंच लागेल,’ वाचा काय म्हंटलंय कायदेतज्ञांनी?
sushama andhare : सुषमा अंधारेंच्या सभेला गुलाबरावांची हजेरी, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
raju shetti : …तर मी विरोधकांसोबत जाणार, राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं, राजकीय समीकरण बदलणार