“महिंद्रा है तो मुमकिन है”! ५ फूट पुराच्या पाण्यातून सुसाट निघालीय बोलेरो; पाहा व्हिडिओ

गुजरातमधील राजकोट आणि जामनगरमध्ये गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. सर्वत्र पाणीच पाणी असून या पुरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुजरातच्या राजकोटमध्ये भरलेल्या पाण्यामध्ये एका व्यक्तीने महिंद्रा बोलेरो एसयूव्हीचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्राही आश्चर्यचकित झाले आहेत.

आनंद महिंद्रा‌ यांनी या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली की, बोलेरोच्या क्षमतेमुळे ते अगदी प्रभावित झाले आहे. “गंभीरपणे? नुकत्याच झालेल्या पावसाच्या वेळी? मी सुद्धा आश्चर्यचकित झालो आहे, ”असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले.

या व्हिडिओमध्ये बोलेरो कार सुमारे चार ते पाच फूट पाण्यात बुडाली आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाने ती पुढे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ “महिंद्रा है तो मुमकिन है” या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी कॅप्शनमध्ये गुजरात पोलीस, राजकोटचे जिल्हाधिकारी आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक यांना टॅग केले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा यांनी अलीकडेच सात सिटर मॉडेल बोलेरो निओ लाँच केली आहे. ज्याची किंमत 8.48 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

जामनगरमधील एक राष्ट्रीय महामार्ग आणि सौराष्ट्र विभागातील राजकोट, जामनगर आणि जुनागढ जिल्ह्यांमधून जाणारे 18 राज्य महामार्ग पुरामुळे बंद झाले, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यांना जोडणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातमधील गेल्या २४ तासांत अतिवृष्टी‌ झाल्याने, त्यानंतर पुरातील पाण्यात अडकलेल्या २०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आणि जिल्यातील ७००० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या
तारक मेहता फेम अभिनेत्याचा भीषण अपघात
प्रवीण दरेकरांना एवढी मस्ती कशाची आलीय? माफी मागा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही
“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली, जय मल्हार”
या माणसामुळे लागला होता गुंड या शब्दाचा शोध, इंग्रजांच्या काळापासून प्रचलित आहे हा शब्द

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.