गुजरातमध्ये कर्मचारी ८ महिन्यात फक्त १६ दिवस कामावर हजर; गैरहजेरीचे सांगितले विचित्र कारण

ऑफिसला जाता न यावे म्हणून बरेच कर्मचारी वेग वेगळे कारण देत असतात. गुजरात सरकारच्या एका अधिकाऱ्याने पण ऑफिसला न जाता यावे म्हणून अजब गजब कारण दिले आहे. या अधिकाऱ्याने असा काही दावा केला आहे की ते ऐकून तुम्हीच चकित व्हाल.

त्याने म्हटले आहे की, जगाचे अंतःकरन बदलण्यासाठी आपण पूजा करत असून त्यामुळे आपल्याला ऑफिसला येत येत नाही. त्या अधिकाऱ्याला या संदर्भात नोटीस पण बजावण्यात आली आहे. सरदार सरोवर पुनर्वास एजन्सीचे रमेशचंद्र फेफर यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

या नोटीसला उत्तर देताना अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपण करत असलेल्या तपश्चर्येमुळे देशात चांगला पाऊस पडत आहे. त्याने पुढे म्हटले आहे की, तुम्ही विश्वास करू शकणार नाही पण मी भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे मी तुम्हाला सिद्ध पण करून दाखवेल.

मी जेव्हा मार्च २०१० ला ऑफिसला गेलो होतो तेव्हा मला समजले भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्की आहे. तेव्हापासून माझ्याकडे दिव्या शक्ती आहेत असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

त्यांना तीनच दिवसांपूर्वी करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी त्यावर उत्तर देताना तपश्चर्येत व्यस्त असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी ऑफिसला जाऊन तपश्चर्या करू शकत नाही, त्यामुळे मी ऑफिसला जात नाही.

त्यांनी म्हटले आहे की, १९ वर्षांपासून पाऊस होत आहे याला कारण माझी तपश्चर्या चालू आहे. आता कार्यालयनेच ठरवायचे आहे की माझी त्यांना जास्त गरज आहे की देशाला कारण मी आजपर्यंत केलेल्या मेहनतीमुळेच देशात पाऊस पडत आहे. त्यांनी आठ महिन्यात फक्त १६ दिवस ऑफिसला हजेरी लावली आहे.

ताज्या बातम्या
मी हे खपवून घेणार नाही; लग्नाच्या पोस्टवर घाण कमेंट करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची थेट धमकी

तौते वादळात नौदलाने बजावली कामगिरी; समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काढले सुखरूप बाहेर

सोलापूरच्या भांगे कुटुंबियांचा नादच नाय! तीन गुंठ्यांत ७५ प्रकारची पिके, कमावतात हजारो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.