ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांचा मुदतीआधीच तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

गुजरातच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिला आहे. विजय रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राजीनामा दिला आहे.

विजय रुपाणी यांच्या अशा अचानक राजीनाम्यामुळे गुजरातच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक १५ महिन्यानंतर होणार आहे. पण त्याच्या आधीच विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी विजय रुपाणी म्हणाले, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मी नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे, लवकरच गुजरातचा नवीन मुख्यमंत्री निवडण्यात येईल, असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

विजय रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावेळी भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ मतदार संघात विजय मिळवून बहूमत मिळवले होते. पण गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमध्ये नेतृत्व परिवर्तनाच्या चर्चा सुरु होत्या.

भाजपाशासित राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यात राजीनामा देणारे विजय रुपाणी ३ रे मुख्यमंत्री बनले आहे. जुलैमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जुलैमध्येच उत्तराखंडमध्ये दोनदा मुख्यमंत्री बदलण्यात आले होते.

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप जनतेचे लक्ष भटकवतेय. कोरोनाच्या काळात आलेले अपयश लपवण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

फक्त पैसे कमावण्यासाठी BCCI ने धोनीला टिम इंडीयात घेतलय; वाचा पडद्यामागचे सत्य
फोर्डच नाही तर आणखी ४ हजार कंपन्यांनाही पडतील बंद, हजारो नोकऱ्या संकटात; वाचा…
बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.