गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले घबाड; मशीन आणल्या तरी रात्रभर नोटा मोजून होईना

राजस्थानवरून गुजरातला जाणाऱ्या एका कारमधील पैसे पोलिसांनी जप्त केले आहेत. राजस्थान पोलिसांनी ही अभूतपूर्व कामगिरी पार पाडली आहे. राष्ट्रीय महामार्ग ८ वर ही कारवाई डुंगरपूर पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी एका कारमधून तब्ब्ल ४.५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. जप्त केलेली रक्कम हवाल्याची असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी जी कर जप्त केली आहे ती दिल्लीहून गुजरातकडे जात असल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली हा फार मोठा प्रश्न सर्वाना सतावत आहे.

याबाबत अधिक माहिती विचारली असता डीएसपी मनोज सवारिया यांनी सांगितले आहे की, कारमध्ये सापडलेले पैसे जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपींची पण चौकशी करण्यात येत आहे.

प्राथमिक तपस केला असता ही रक्कम हवाल्याची असल्याची माहिती समजली आहे. आरोपींची चौकशी सुरु असून पोलीस योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जप्त करण्यात आलेल्या कारमधील नोटांची बांदल पाहून पोलिसांची बोबडीच वळली आहे.

पोलीस ठाण्यात एवढ्या मोठ्या रकमेचे पैसे मोजण्यासाठी मशिन्स नव्हत्या. मशिन्स बँकेतून मागवून पैसे मोजावे लागले. सकाळी नोटा मोजायला सुरुवात केल्यावर संध्याकाळ पर्यंत पैसे मोजण्याचे काम चालू होते. पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली असून कारचे पासिंग दिल्लीचे आहे.

ताज्या बातम्या
दिग्दर्शक प्रकाश झा यांची पहीली पत्नी होती सेक्स वर्कर? रातोरात बदलले होते घर

खलनायक रणजितच्या प्रेमात पागल झाली होती अभिनेत्री सिंपल कपाडिया; राजेश खन्नामूळे केले ब्रेकअप

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घातला धुमाकूळ?; ‘या’ ठिकाणी तब्बल ३४१ मुलांना झाला कोरोना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.