आयपीएल २०२२ चे विजेतेपद गुजरात टायटन्स संघाने पटकावले आहे. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने(Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.(Gujarat Titans earns crores in IPL debut)
आयपीएल २०२२ चा विजेता संघ गुजरात टायटन्सनला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेता असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला बक्षीस म्हणून १२.५ कोटी रुपये मिळाले आहेत. आयपीएल २०२२ च्या हंगामात सर्वात जास्त धावा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू असलेल्या जोस बटलरने केलॆल्या आहेत.
त्याने संपूर्ण हंगामात १६ सामन्यांमध्ये ८६३ धावा केल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलर ऑरेंज कॅपचा विजेता ठरला आहे. त्याला बक्षीस म्हणून १० लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलरला Most Valuable Player हा पुरस्कार देखील मिळाला. यासाठी बक्षीस म्हणून जोस बटलरला १० लाख रुपये मिळाले आहेत.
आयपीएल २०२२ च्या हंगामात सर्वात जास्त विकेट राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने घेतल्या आहेत. त्याने १६ सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यजुर्वेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याला १० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच Emerging Player of the Year चा किताब सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू असलेल्या उमरान मलिकला मिळाला आहे.
त्याला बक्षीस म्हणून २० लाख रुपये मिळाले आहेत. ‘गेम चेंजर ऑफ द सिझन’ चा पुरस्कार राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलरला मिळाला आहे. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू असलेल्या जोस बटलरला १३१८ गुण मिळाले आहेत. यासाठी बक्षीस म्हणून जोस बटलरला १० लाख रुपये मिळाले आहेत.
Super Striker of the Season चा किताब रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा खेळाडू असलेल्या दिनेश कार्तिकला मिळाला आहे. त्याला बक्षीस म्हणून १० लाख आणि टाटा पंच गाडी मिळाली आहे. आयपीएल २०२२ चा फेअर प्ले अवार्ड गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाला विभागून देण्यात आला आहे. याशिवाय Fastest Delivery of the Season चा पुरस्कार गुजरात टायटन्सचा खेळाडू असलेल्या ल्युकी फर्ग्युसनला मिळाला आहे. त्याला १० लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मृत्यू झालाय, त्यांच्याजागी सत्तेवर त्यांच्यासारखाच दिसणारा….