चिंतेत भर! कोरोनावर मात केली तरी सुटका नाहीच; ‘या’ आजाराचा आहे धोका

मुंबई | देशासह राज्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली. मात्र अशातच एक चिंतेत आणखी भर पडणारी माहिती समोर येत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना वेगवेगळ्या आजारांचा धोका असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

याबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यांपर्यंत रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा, एन्जायटी, डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत असलाची माहिती समोर आली आहे.

तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळ असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, ‘कोरोना विषाणू हा फुफ्फुसावर परिणाम करतो. मात्र, या विषाणूमुळे मानवी शरीरातील अवयवांसह मेंदूवर घातक ठरतो. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं असल्याचे यांनी म्हंटले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

ग्राहकांना धक्का! बॅंकांनी FD वरील व्याजदर केले कमी, जाणून घ्या नवीन दर
अरेरे! मुतखडा काढायला गेला आणि काढून बसला किडनी, मग पुढे झाले असे की…
सुशांतचे ‘ते’ व्हिडिओ अपलोड करून युट्युबरने कमवले लाखो रुपये; वाचा सविस्तर..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.