VIDEO: बुटं कोणी चोरावे नाही म्हणून बुटांवरच बसला नवरदेव, पहा मग मेहूणींनी काय केलं

सध्या सगळीकडे लग्न सोहळे पार पडताना दिसून येत आहे. लग्नामधले नवरीच्या एंट्रीचे, नवऱ्याच्या डान्सचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता पण एका लग्नातील व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मेहूणी आणि तिच्या मैत्रिणी नवरदेवाचे बुटं चोरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण नवरदेव पण काही कमी नसून तो त्यांना आपले बुट चोरुन देत नसून आपल्या बुटांना पायाखाली दाबून ठेवले आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की मेहूणी आणि तिच्या मैत्रिणी बुटं चोरण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांना थांबवण्यासाठी नवरदेव आणि त्याचे मित्र बुटं लपवत आहे. तेवढ्यात नवरदेव जमिनीवर झोपुन घेतो.

नवरदेव जमिनीवर झोपायला लागल्यामुळे मेहूण्या हसायला लागतात. पण नवरदेवाचे पुर्ण लक्ष आपल्या बुटावर असते आणि त्या बुटांना वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न तो करताना दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांना खुप आवडला आहे. कारण ज्या पद्धतीने मेहूण्या बुटं चोरण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी त्यांना एवढी धडपड करावी लागत आहे, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी बघितले असून अनेक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओला टेंड्रिंग दुल्हनिया या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आले आहे.

तसेच या व्हिडिओला लोकांनी काही मजेदार कमेंट केल्या आहे. एका युजरने तर नवरदेव जरा जास्तच कंजुस वाटतो, तर एकाने पैसे वाचवण्यासाठी नवरदेव तर जमिनीवर लोळायला लागला आहे. तर एकाने पैसे वाचवण्यासाठी सर्वात मस्त आयडीया, शाब्बास नवरदेवा असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ज्या ठिकाणी बाप कॉन्स्टेबल तिथेच मुलगा आयपीएस बनत एसपी झाला; आज बाप पोराला ठोकतोय सलाम
बाबा का ढाबाला युट्युबर गौरव वासनने दिली भेट, बाबा त्याच्या गळ्यात पडून रडले आणि म्हणाले..
विराट कोहलीच्या फ्लॅटपेक्षा दुप्पट महाग आहे युवराज सिंहचा फ्लॅट; किंमत वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.