जबरदस्त! कुस्तीपटू रवि कुमार दहिया फायनलमध्ये; आता सुवर्णपदकासाठी लढणार

टोकियो। ऑलिम्पिकमधून भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू रवि कुमार दहियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. ५७ किलो वजनी गटात रवि कुमार दहियाने कझाकस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव केला.

२-९ अशा पिछाडीवरून रवी कुमारनं शानदार खेळी करत अंतिम फेरीत स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता भारताचे चौथे ऑलिम्पिक पदक निश्चित झाले आहे आणि आता रवी कुमारकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा लागल्या आहेत.

त्याने सेमीफायनलमध्ये कझाकस्तानच्या नुरिस्लाम सनायेवला हरवत फायनलला धडक दिली. त्याने एक मिनिट बाकी असतानाचा कझाकस्तानच्या कुस्तीपटूला हरवले व भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले. त्यामुळे देशात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र सर्व आता सुवर्णपदकाच्या अपेक्षेत आहेत.

याआधी महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती.

या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं. मात्र आज ती मैदानात उतरली होती पण तिला यश मिळालं नाही. मात्र लवलीनानं केलेल्या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बिकिनीतील हॉट फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा, चाहते झाले घायाळ
“काय होतीस तू काय झालीस तू…”; ‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कौतुकास्पद! केवळ १५ हजारांच्या गुंतवणूकीवर नागपूरच्या दोन तरुणांनी विस्तारला १८ कोटींचा व्यवसाय…
केंद्र सरकारचा मुळावर घाव, थेट १०२ व्या घटनादुरुस्ती कायद्यात करणार बदल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.