‘अखंडा’चा शानदार ट्रेलर रिलीज; भारतरत्नवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नंदामुरींनी जिंकली चाहत्यांची मने

नंदामुरी बालकृष्ण सध्या त्याच्या आगामी ‘अखंड’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नंदापुरी या चित्रपटात अतिशय आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारताना दिसत असून नुकताच अखंडचा नवा ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे, जो यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओमध्ये नंदामुरी अघोराच्या एका दमदार पात्रात दिसत आहे. ट्रेलर पाहता, ‘अंखड’मध्ये नंदामुरी आपल्या अप्रतिम अभिनयाची ओळख करून देताना दिसणार आहे. अवघ्या १६ तासात ८५ लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. द्वारका क्रिएशन्सने १४ नोव्हेंबरला ‘अखंड’ चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यावर २० हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि ३ लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी लाइक दिल्या आहेत.

हा चित्रपट 2 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील. ताज्या व्हिडिओचा सीक्‍वेन्स पाहता ‘अखंड’ पडद्यावर निर्मात्यांसाठी लकी ठरणार आहे, हे लक्षात येते. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘अखंड’ची उत्सुकता आणखी वाढली आहे.

बोयापती श्रीनू दिग्दर्शित या चित्रपटाला थमन एस यांचे संगीत आहे. द्वारका क्रिएशन्स अंतर्गत मिर्याला रविंदर रेड्डी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटात अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल मुख्य भूमिकेत दिसत आहे, तर जगपती बाबू आणि श्रीकांत सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

अखंडचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचा मुख्य अभिनेता नंदामुरी बालकृष्णाच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती आहे. अभिनेता गेल्या अनेक महिन्यांपासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो आता बरा असून घरी विश्रांती घेत आहे.

अभिनयासोबतच नंदामुरी आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत तो एआर रहमानला म्हणाला होता, ‘एआर रहमान कोण आहे हे मला माहीत नाही. मला काही फरक नाही पडत. दहामधून एकदा, तो एक हिट चित्रपट देतो आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळतो.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एआर रहमानने नंदामुरी बालकृष्णाच्या निप्पू रव्वा (1993) साठी संगीत दिले होते. अभिनेत्याचे आणखी एक विधान जोरदार व्हायरल झाले ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ते भारतरत्नला महत्त्व देत नाहीत.

नंदामुरी म्हणाले की, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामाराव यांच्यासाठी योग्य नव्हता आणि हे सर्व पुरस्कार माझ्या चरणा समान आहेत. तेलुगू सिनेमातील माझ्या कुटुंबाच्या योगदानाची भरपाई कोणताही पुरस्कार करू शकत नाही. मला वाटते की भारतरत्न हा एनटीआरच्या नखाइतकाच आहे.

महत्वाच्या बातम्या
समीर वानखेडेंनी आपल्या पहिल्या पत्नीलाही नाही सोडले, मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप
ज्ञानदेव वानखेडे हिंदूच; क्रांती रेडकरने समीर वानखेडेंचा जन्मदाखलाच दाखवला
खरंच मुख्यमंत्री शिवराज सिंहांना मोदींच्या फ्रेममध्ये येण्यापासून रोखलं? जाणून घ्या सत्य..
नावावर ११७ पावत्या तरी बिंधास्त चालवत होता गाडी, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर भरावा लागला ‘इतका’ दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.