पैसा नाही मोठं मन पायजे! भाजी विकून पोट भरणाऱ्या आजीने मुख्यमंत्री निधीला केली लाखाची मदत

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा गोरगरीबांना मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे कोरोनात हाल झाले आहेत.

कोरोना काळात नेते, कलाकार, खेळाडू, उद्योजक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीही मागे नाहीत. ते सुध्दा होईल तेवढी मदत गरजूंना करत आहेत. काही दिवसांपुर्वी मध्य प्रदेशमधील एका रिक्षाचालकाने पत्नीचे दागिने विकून रिक्षाची रुग्णवाहिका बनवली होती.

यामुळे त्या रिक्षाचालकाचे संपुर्ण देशभरात कौतूक होत आहे. पुण्यातही एका आजीने कोरोना रुग्णांसाठी  १ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या आजी भाजी विकून आपल्या पोटाची खळगी भरतात.

मालन वणवे असं या दानशूर आजीचं नाव आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजी विकून आजींनी बॅंकेत १ लाख रुपयांची एफडी केली होती.

कोरोनाचे संकट आले आणि आपणही कोरोना रुग्णांसाठी काहीतरी मदत करायचं ठरवलं. आजींनी नातवांच्या शिक्षणासाठी बॅंकेत जी एफडी करून ठेवली होती ती मोडायची ठरवली. आजीच्या या निर्णयाला घरच्यांनीही तयारी दर्शवली.

आजींनी १ लाख रुपयाच्या मदतीचा चेक भाजप नेते गिरीश बापट यांच्याकडे दिला आहे. स्वत: दिवसभर भाजी विकून पोट भरणाऱ्या आजींनी कोरोना रुग्णांसाठी मदत केल्याने आजीचे कौतूक होत आहे. गरीब असूनही त्यांच्यात मनाची किती श्रीमंती असते हे आजींनी दाखवून दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी
तरुणीला वडिलांसाठी हवे होते ऑक्सिजन सिलिंडर; शेजाऱ्याने ठेवली घृणास्पद मागणी
लाडकी लेक जीजासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारेचे भन्नाट नृत्य, लेकीनेही धरलाय ठेका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.