‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’

मुंबई | ‘मागील फडणवीस सरकार उद्योगांमधील गुंतवणूक करण्याबाबत नुसते करारच करत होते. त्यांच्यात या बाबतीत उत्सवप्रियता होती. ती टाळून महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितपणे गुंतवणूक होईल, अशा उद्योगांना प्राधान्य देत आहे,’ असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

केनवडे येथे नव्याने उभारणी केलेल्या अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. या रसायनमुक्त साखर आणि गुळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मुंबई, पुणे, हिंजवडी प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. सुमारे शंभर एकर जागेमध्ये हा उद्योग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही सुभाष देसाई यांनी येथे बोलताना दिली. यामुळे आता कोल्हापुरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, ‘चांगल्या सुविधा, सवलती दिल्या जात असल्याने उद्योजकांचा ओढा महाराष्ट्राकडे आहे. या माध्यमातून राज्याचा महसूल वाढणार आहे. लाखो तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे याचा अधिक आनंद असल्याचेही देसाई यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाथाभाऊंनी भाजपाला पाडले खिंडार! ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
‘१०० हून जास्त खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.