इंडिअन आयडल १२: अनु मलिक यांना डेडिकेट होणार ग्रैंड फिनाले थीम; जाणून घ्या काय काय घडणार….

‘इंडियन आयडॉल’ चा यावर्षीचा शो सतत चर्चेत असलेला पाहायला मिळाला. आता हा आवडता शो शेवटच्या टप्प्यावर आहे. शोच्या ग्रँड फिनालेबाबतच्या चर्चांना उधान आलेलं आहे. असे म्हटले जाते की ग्रान्ड फिनालेचा भाग बारा तास प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच हे देखील कळले होते की, शोच्या काही काळ जज असलेल्या नेहा कक्कड या फिनालेचा भाग होणार नाहीत. कारण नेहा सध्या तिचा पती रोहनप्रीतसोबत फिरण्याचा आनंद घेत आहे. नेहा कक्कड आपल्या जागी बहिण सोनू कक्कडला जजच्या खुर्चीवर बसवल्या प्रकरणीदेखील अनेक वाद-विवाद निर्माण झाले होते.

ग्रँड फिनालेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की विजेतेपद कोण जिंकेल. प्रत्येक चाहत्याला आपला आवडता स्पर्धक विजेता व्हावा अशीच इच्छा आहे. तसेच या गोष्टींवरून अनेक नेटकर्यांनी विशेष टिपण्यादेखील दिल्या आहे.

जर या शोच्या सूत्रांवर विश्वास ठेवला गेला तर, या वर्षीचा ग्रँड फिनाले न्यायाधीश अनु मलिक यांना डेडिकेट करण्याची योजना आहे. अनु मलिक बऱ्याच काळापासून या शोचा भाग आहे. स्पर्धकांना आपल्या विशेष टिपण्या देऊन त्यांनी प्रेरित केले आहे. अनु मलिकशिवाय इंडियन आयडॉल अपूर्ण आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तसेच गेल्या आठवड्यातच त्यांच्या आईच निधन झाल आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना वाटते की, ही भावनिक गोष्ट त्यांचे दुःख कमी करू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोचे शूटिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आले आहे. ५ किंवा ६ ऑगस्टला शूटिंग पूर्ण होईल.

यासोबतच इंडियन आयडॉलशी संबंधित अनेक कलाकारांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच क्रिएटिव्ह टीमने या गायकांना स्टेज परफॉरमेंससाठी विनंती केली आहे. माजी स्पर्धकांनादेखील बोलवण्यात आहे आहे. तसेच त्यांच्या चांगल्या कामगिरीचा मोबदलादेखील त्यांना दिला जाणार आहे.

हे ही वाचा-

मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

देशातील बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी पडून, लोक पैसे जमा करून विसरले

असला जावई नको ग बाई! राग आला म्हणून जावई सासुरवाडीत आला अन् थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.