‘वल्लव रे नखवा’ या गाण्यावर आज्जीने केला तुफान डान्स, पाहून सगळेच झाले थक्क; पडत आहे लाईक्सचा पाऊस…

अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सोशल मिडीयावर सक्रीय असलेले पाहायला मिळतात. तसेच सगळेचजण आपले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करताना पाहायला मिळतात. जर सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओ मधील व्यक्ती रातोरात प्रसिद्ध होत असतात.

याच गोष्टीच उत्तम उदाहरण म्हणजे राणू मंडल आणि ‘बचपन का प्यार’ गाणारा सहदेव होय. हे दोघेही अगदी कमी काळात प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळाले. अशाच प्रकारे भारतात अनेकांना नेटकऱ्यानी स्टार बनविले आहे.

सध्या एका वयस्कर आज्जीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये आज्जी डान्स करताना दिसून येत आहेत. आजी नृत्याचा मनसोक्त आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडिओमधून आज्जीच कलेवर असलेलं प्रेम स्पष्ट होत आहे.

हा व्हिडिओ एका हळदी समारंभातील मधील असल्याचे समजते. जवळपास ७०-८०  वयाच्या दिसणाऱ्या आज्जीने असा डान्स केला की तिथे उपस्थित सर्व लोकांनी भरभरून कौतुक केले. आज्जीने ‘वल्लव रे नाखवा’ या गाण्यावर ताल धरलेला पाहायला मिळतो. तसेच इतरांनाही आपल्या तालावर नाचायला भाग पडले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. लाल नऊवारी साडी आणि चोळीच्या जोडीला नथ घातल्याने आजींच्या सौदर्यात भर पडली आहे. तसेच ओठांवर गाण्याचे बोल बोलत आज्जी प्रचंड उत्साहाने नाचताना पाहायला मिळत आहे.

लोकं अनेक समारंभात तसेच पार्ट्यांमध्ये मनसोक्त नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अशाच लोकांमुळे कार्यक्रमाला चार चांद लागतात अस म्हणायला हरकत नाही. आजींनी देखील कार्यक्रमात डान्स करून कार्यक्रमाची उर्जा वाढवली आहे. तसेच एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे ही दाखवून दिले आहे.

हे ही वाचा-

मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण

आश्विनला टीमबाहेर केल्यामुळे चाहते कोहलीवर भडकले, म्हणाले, गर्विष्ठ कर्णधार

सामनावीर ठरलेल्या रोहितचे शार्दुलबाबतचे मत ऐकून तुम्हीही म्हणाल, मोठ्या मनाचा राजा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.