२१ वर्षाचा ऋतुराज सरपंच तर २३ वर्षाची राजश्री उपसरपंच

सोलापूर | मागच्या काही दिवसांपासून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागल्यापासून सरपंच कोण होणार याच्याच राज्यभर चर्चा होत्या. यात सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील २१ वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख यांनी विजय मिळवत सर्वांत तरुण सरपंच होण्याचा मान पटकवला आहे. तर वयाच्या तेविसव्या वर्षी राजश्री शाहजी कोळेकर वयाच्या 23 व्या वर्षी उपसरपंच झाली आहे.

ऋतुराज आणि राजश्री यांच्या निवडीमुळे घाटणे गावची सत्ता तरुणाईच्या हातात गेली आहे. ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनल कडून त्याने निवडणूक लढवली. ऋतुराजने ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले होते. आता सरपंच पदाची निवडणूक देखील ऋतुराजने जिंकली आहे. त्यामुळे ऋतुराज हा राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
नादच खुळा! एकवीस वर्षांच्या तरुणाने स्वत:च पॅनेल उभं करुन विरोधकांना चारली धुळ
ठाकरे सरकारचा रामदेव बाबांना दणका! पतंजलीच्या औषधाला महाराष्ट्रात परवानगी नाही
मुलाचा विवाहसोहळा शाही थाटात करणं धनंजय महाडिकांना पडले महागात; वाचा सविस्तर
‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.