‘या’ धक्कादायक कारणामूळे अभिनेत्री काजोलने आजपर्यंत गोविंदासोबत काम केले नाही

बॉलीवूडच्या सर्वात चुलबूली अभिनेत्रींमध्ये काजोलचे नाव सर्वात पहीले येते. तिने तिच्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती जास्त चित्रपट करत नसली तरी तिने अभिनय क्षेत्र सोडलेल नाही. ती तिच्या चाहत्यांसाठी वर्षातून एखादा चित्रपट तर नक्कीच करते.

काजोल बॉलीवूड अभिनेत्री तनूजाची मुलगी आहे. काजोलने १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘बेखूदी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट जास्त यशस्वी झाला नाही. परंतू काजोलला इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख मिळाली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

१९९५ मध्ये रिलीज झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटामध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भुमिका साकारली होती. या चित्रपटानंतर काजोल रातोरात सुपरस्टार झाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्यानंतर काजोलने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

काही वर्षांमध्येच काजोल बॉलीवूडची सुपरस्टार झाली होती. ती टॉपची अभिनेत्री म्हणून प्रसिद्धझोतात आली होती. काजोलने तिच्या करिअरमध्ये बॉलीवूडच्या सर्व सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. पण तिची जोडी सर्वात जास्त शाहरुख खानसोबत पसंत केली गेली.

काजोल आणि शाहरुखने अनेक चित्रपट एकत्र केले. सर्व कलाकारांसोबत हसून खेळून काम करणाऱ्या काजोलने तिच्या करिअरमध्ये फक्त एका अभिनेत्यासोबत काम केले नाही. हा अभिनेता बॉलीवूडचा सर्वात मोठा स्टार आहे. पण तरीही तिने त्याच्यासोबत कधीही काम केले नाही.

या अभिनेत्याचे नाव आहे गोविंदा. ९० च्या दशकामध्ये गोविंदा बॉलीवूडचे सर्वात मोठे स्टार होते. त्यांच्यासोब काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री तयार असायच्या. गोविंदाकडे चित्रपटाच्या स्क्रिप्ट घेऊन दिग्दर्शक यायचे. पण एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत काजोलने कधीही काम केले नाही.

काजोल आणि गोविंदाने एकमेकांसोबत काम केले नाही. या गोष्टी मागे एक खास कारण आहे. काजोलने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने स्वत एका मुलाखतीमध्ये गोविंदासोबत काम न करण्याचे कारण सांगितले होते.

काजोलला तुम्ही तुमच्या करिअरमध्ये गोविंदासोबत काम का केले नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर काजोल म्हणाली की, ‘गोविंदा बॉलीवूडचे खुप मोठे स्टार आहेत. त्यांच्यासोबत काम करणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न होते. माझेही होते. पण मला ती संधी मिळाली. आम्हाला एकत्र चित्रपट ऑफर झाले नाहीत.’

काजोल पुढे म्हणाली की, ‘आम्ही ‘जंगली’ नावाचा चित्रपट एकत्र साईन केला होता. पण हा चित्रपट बंद झाला. आम्ही खास या चित्रपटासाठी फोटोशूट केले होते. जंगली चित्रपट कधी बनू शकला नाही. त्यानंतर आम्हाला कोणत्याही निर्मात्यांनी एकत्र साईन केले नाही. या खास कारणामूळे आम्ही एकत्र काम करु शकलो नाही’.

‘गोविंदा सध्या जास्त चित्रपट करत नाही. पण भविष्यात जर आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर मग नक्कीच आम्ही एकत्र काम करु’. असे काजोलने सांगितले. काजोल सध्या तिच्या त्रिभंग वेबसीरीजमूळे खुप जास्त चर्चेत आहे. या सीरीजला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कपिल शर्मा शोमधील चंदूची पत्नी पाहून तुम्ही वेडे व्हाल; अभिनेत्रीं पेक्षाही दिसते खुपच ग्लॅमरस

प्रेमात पागल झालेल्या प्रीती झिंटाने करिअरकडे केले दुलर्क्ष; आज झाली आहे ‘अशी’ अवस्था

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अडचणीत; बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीचा आत्मह.त्येचा इशारा

मोनालिसा झाली तानाजीवर फिदा, फोटो शेअर करत म्हणाली..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.