‘या’ कारणामूळे गोविंदाने त्यांच्या लग्नाची बातमी लोकांपासून लपवली होती; एवढ्या वर्षांनी कारण आले समोर

बॉलीवूड अभिनेते गोविंदाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये राज्य केले आहे. राजा बाबू, आग, कुली नंबर वनसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे गोविंदा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत.

सध्या गोविंदा लाइमलाईटपासून दुर राहत आहेत. पण यशाच्या शिखरावर असताना त्यांनी अनेकांना वेड लावले आहे. ९० च्या दशकात गोविंदा त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयूष्यामूळे देखील खुप प्रसिद्ध होते. त्यांच्या खऱ्या आयूष्यात नक्की काय सुरु आहे.

यशाच्या शिखरावरावर असताना गोविंदाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अभिनेत्री नीलम त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी सगळ्यांना धक्का बसला होता. कोणाशीही नाव जोडले गेले तरी गोविंदाने मात्र एका सामान्य मुलीसोबत लग्न केले होते.

गोविंदाने सुनीता अहूजासोबत लग्न केले. एका पार्टामध्ये गोविंदा आणि सुनीताची भेट झाली होती. सुपरस्टार असलेले गोविंदा एका सामान्य मुलीच्या प्रेमात पडले होते. गोविंदा आणि सुनीताने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यावेळी गोविंदाचे वय २३ होते तर सुनीताचे वय १८ वर्ष होते.

असे बोलले जाते की, करिअरच्या सुरुवातीलाच सुनीतासोबत लग्न केले होते. पण त्यांनी ही गोष्ट लवपून ठेवली. त्यांनी लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही. कारण लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर गोविंदाचे करिअर खराब झाले असते. करिअरसाठी त्यांनी लग्नाची बातमी लपवून ठेवली होती.

पण ज्यावेळी सुनीताने त्यांची मुलगी टिनाला जन्म दिला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची गोष्ट समोर आली होती. मुलीच्या जन्मानंतर गोविंदाचे लग्नाची गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. पण तरीही गोविंदाच्या करिअरवर काहीही फरक पडला नाही.

दोघांच्या लग्नाला ३० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. तरीही दोघे आनंदाने संसार करत आहेत. कधीच त्यांच्या भांडणाच्या बातम्या समोर आल्या नाहीत. आजही दोघे एकत्र आहेत. गोविंदाची मुलगी टिना देखील बॉलीवूडची अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दिग्दर्शकाने Action म्हणताच अभिनेते प्राणने किशोर कुमारच्या कानाखली वाजवली आणि…
सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..
आलियाने सांगितला व्हॅलेंटाईन डेचा वाईट अनुभव; माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला बाहेर नेले होते आणि माझ्यासोबत…
…म्हणून जुही चावलाने आमिर खानला किस करायला दिला होता सरळ सरळ नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.