विमानाची परवानगी नसतानाही राज्यपाल विमानतळावर गेले, मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई | राज्यातील ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. देहरादूनला निघालेल्या राज्यपालांना शासकीय विमानातून खाली उतरावे लागले. यावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपालांनी दौऱ्याआगोदर त्यांना विमान वापरण्यासाठी परवानगी आहे की नाही याची खातरजमा करुन घ्यायला हवी होती. याबाबत शासनाची कोणतीही चूक नाही. असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितले गेले आहे.

शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते. मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध करुन दिले जाते. मात्र मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिली गेली नव्हती. ही परवानगी दिलेली नसताना राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याचे नियोजन करत त्यांना विमानतळावर आणले.

राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करुन न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाचा वापर करुन इच्छित स्थळी जाता आले नाही. यासाठी राज्यपालांसारख्या पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे गरजेचे होते.

तसेच या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबतची राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडीत खळबळ! सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांची भेट घेऊन दिली १२ नावांची यादी
राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीवर अद्यापही राज्यपालांचे मौन; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकरला धक्का; श्रेयस अय्यरची कर्णधारपदी निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.