Share

‘मोदींच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे’, राज्यपाल संतापले

narendra-modi.j

काही दिवसांपूर्वी मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना बंद करण्याचे आवाहन केले होते. आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह(Satypaal Singh) आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असतात. राज्यपाल सत्यपाल सिंह नेहमीच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर टीका करत असतात.(Governor satypaal singh angry on pm narendra modi)

आता पुन्हा एकदा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. माझा राजीनामा माझ्या खिशामध्येच आहे. मी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा मागण्याची वाट पाहत आहे”, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. यावेळी मुलाखतीत मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह म्हणाले की, “आंदोलनामध्ये ७०० शेतकरी मरण पावले. पण केंद्र सरकारने त्यांच्याबाबत साधा शोक संदेशही पाठवला नाही. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. शेतकरी आंदोलन झाल्यानंतर मोदी सरकारने माफी मागून विधेयक मागे घेतले. मी नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे”, असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह पुढे म्हणाले की, “अग्निपथ योजनेच्या संदर्भात सरकारने पुन्हा एकदा विचार करायला हवा. अशा गोष्टी घडायला नकोत. मुलं जर मुलं अग्निपथ योजनेबाबत असंतुष्ट असतील आणि अशा मुलांच्या हातात जर रायफल असेल. तर याचे परिणाम काय होतील याची आपण कल्पना करू शकत नाही.”

“केंद्र सरकार उद्दामपणे वागत आहे. कोणतीही वाईट घटना घडण्यापूर्वी सरकारने बॅकफूट यायला हवे आणि योग्य निर्णय घ्यायला हवा”, असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह म्हणाले की, “मी पहिल्यांदा बोलल्यापासून माझ्या खिशात राजीनामा आहे. ज्या दिवशी मोदींकडून संकेत मिळतील, त्या दिवशी मी निर्णय घेईन. फक्त मला म्हणा तुमच्याबरोबर काम करताना अस्वस्थ वाटते. मी त्याच दिवशी निघून जाईन”, असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ किसिंग सीनमुळे ऐश्वर्या रायवर संतापले होते लोक, पाठवली होती लीगल नोटीस
शिवसेनेचे खासदारही भाजपशी हात मिळवणार? ११ आमदारांनी घेतली अमित शहांची भेट
शिवसेनेने सर्व याचिका मागे घ्याव्यात, बहुमताचा आदर करावा, भाजपची मागणी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now