मोठी बातमी! पंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, मुख्य सचिवांना केला फोन, आणि…

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पालखी सोहळा सध्या साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पायी वारीच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सोमवारी भेटले. यामुळे आता त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आहे.

राज्यपालांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन करून सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे आता वारीसाठी चालत जाण्यासाठी परवानगी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वारकरी आक्रमक झाले आहेत.

ते म्हणाले, वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा, अशा सूचना दिल्यावर मुख्य सचिवांनी तातडीने या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यामुळे आता पुन्हा काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वारकरी नाराज झाले आहेत. मात्र हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे.

यामुळे वारकऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भेटीनंतर बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल, तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवून पायी वारी करावी, असेही ते म्हणाले.

यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. यामुळे वारकरी आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय दिला होता.

ताज्या बातम्या

‘हम काले हुए तो क्या हुआ’ गाण्यामूळे मनोज कुमार आणि मेहमूदमध्ये झाले होते मोठे भांडण

बाबो! इंटर्नशिपसाठी पठ्ठाने केला ‘असा’ अर्ज; कंपनीने खुश होऊन त्याला दिली लाखो रुपयांची नोकरी

धक्कादायक! पत्नीच्या ‘या’ मागणीला कंटाळून वनरक्षकाने वडाच्या झाडाला गळफास लावून केली आत्महत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.