राज्यपालांनी १२ सदस्यांची यादी नाकारल्यास सरकारपुढे कोणते पर्याय? वाचा तज्ञ काय म्हणतात

मुंबई | मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली विधान परिषदेच्या १२ प्रस्तावित आमदारांची यादी अखेर महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर भाष्य केले आहे.

राज्यपालांना ही यादी किती कालावधीपर्यंत मंजूर करणे हे बंधनकारक असते?
केंद्र सरकारमध्ये मध्ये जशी संसदीय पद्धत आहे. तशीच राज्यात देखील संसदीय पद्धत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो. विधान परिषदेचे जे १२ सदस्य निवडायचे आहेत. जे विविध क्षेत्रातून निवडलेले असतात. ती नावे राज्यपालांना स्वीकारावीच लागतात. राज्यपालांना यामध्ये बदल करण्याचे कोणतेही अधिकार घटनेने दिले नाही.

कधी पर्यंत राज्यपालांना यावर निर्णय घ्यावा लागतो?
जर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली तर त्याला १ महिन्याच्या आत संसदेची संमती असावी लागते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर किती दिवसात किती कालावधीमध्ये राज्यपालांनी याची अंमलबजावणी करावी असे कोणत्याही घटनेत सांगितलेले नाहीये. मात्र आठ दिवसांमध्ये राज्यपालांनी याचा निर्णय दिला पाहिजे असे घटनाकरांना अपेक्षित असते.

…तर राज्य सरकार पुढे कोणते पर्याय?
जर राज्यपालांनी उशीर लावण्याचे ठरवले असेल तर दोनच पर्याय सरकारसमोर उरतात. एक म्हणजे राष्ट्रपतींकडे याचिका करता येईल. याचे कारण असे की, राष्ट्रपतीच राज्यपालांची नियुक्ती करतात आणि काढतात. आणि दुसरा पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जायचे. सुप्रीम कोर्ट राज्यपालांना कायद्यानुसार सूचना देतील.

दिलेल्या नावांवर राज्यपाल आक्षेप घेऊ शकत?
विधान परिषदेच्या १२ नावांमध्ये नेमक कोणाला नेमायचं? हा पूर्ण अधिकार मंत्रीमंडळाला आणि मुख्यमंत्र्यांना आहे. राज्यपालांना यामध्ये हस्तक्षेप करताना येत नाही. पण १६७ कलमानुसार, राज्यपाल चर्चा करू शकतात. त्यांना हवी असलेली माहिती मिळवून घेऊ शकतात. सल्ले देऊ शकतात. मात्र मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असेल.

 

महत्त्वाच्या बातम्या
आता आले टाटाचे कोरोना टेस्ट किट; चिनी टेस्ट किटपेक्षा आहे भारी; खर्चही कमी
अर्णब, तुला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा; बड्या अभिनेत्यानेच्या ट्विटने खळबळ
७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो
साधेपणामूळे प्रसिद्ध आहे साऊथची ‘ही’ सुंदर अभिनेत्री; बोल्ड सीन्सला देते नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.