राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू

मुंबई | विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली.

यामध्ये प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या यादीतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि शरद पोंक्षे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत होते.

उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. मात्र अचानक त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, आता ही देखील शक्यता नाकारण्यात आली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा भरण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकासआघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
आता मी भाजपला माझी ताकद दाखवून देतो; नाथाभाऊ कडाडले
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल
…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.