‘घरगुती गॅसबाबत सरकारचा नवा नियम; जर तुमच्याकडे ‘हे’ नसेल तर तुम्हाला गॅस मिळणार नाही’

नवी दिल्ली | घरगुती गॅस सिलेंडर धारकांसाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे. या नवीन नियमानुसार जेव्हा आपण आपल्या हॉकर्सला आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगाल तेव्हाच आपल्याला गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.

या नवीन नियमामुळे इंडियन ऑइल हे सुनिश्चित करणार आहे की केवळ गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यालाच गॅस सिलेंडर मिळणार आहे.

हा नवीन नियम देशातील काही मोठ्या शहरात लागू करण्यात आलेला आहे. तसेच शहरांनी आणि काही कंपन्यांनी हा नियम प्रायोगिक तत्वावर लागू केलेला आहे.

गॅस घेताना तुम्ही दिलेला ओटीपी हॉकर गॅस एजन्सीकडे वितरित करतील. तेथून कंपनीच्या नवीन एसडीएमएस तो ओटीपी सॉफ्टवेअरवर अपलोड केला जाईल. त्यांनतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे.

दरम्यान, यंत्रणेत सिलेंडरच्या वितारणावर नजर ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती. मात्र आताच्या या नवीन नियमामुळे कंपन्या स्वतःच डिलिव्हरीचे निरीक्षण करू शकणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

१९८३ बॅचने ५०० पेक्षा जास्त एन्काऊंटर करून मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खतरनाक व्हिलन संस्कार पंडीत आठवतोय का?

लोणावळ्याच्या फार्महाऊसवर नेमकं काय व्हायचं?; सुशांतच्या मॅनेजरने केला खुलासा

टूरिस्ट वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला मोठा फायद्याचा निर्णय

‘या’ कारणामुळे झाला होता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानचा घटस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.