‘सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवायला सांगीतलं जातय, नाझी जर्मनीत असंच व्हायचं”

मुंबई। बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह हे कायम आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच नसीरुद्दीन शाह यांच्या यांच्या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.

भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरदेखील निशाणा साधला आहे. सफिल्म इंडस्ट्रीला सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करण्यासाठी प्रोत्साहन केलं जात आहे. सरकारच्या कामाचं कौतुक केलं जाणारे सिनेमे बनवले जातात. त्या सिनेमांना फंडिंगही केलं जातं महत्त्वाचं म्हणजे त्या चित्रपटांना क्लीनचीट देण्याचं आश्वासनही देण्यात येत असल्याचं नसीरूद्दीन शहा यांनी म्हटलं आहे.

एका मुलाखती दरम्यान नसीरूद्दीन शहा म्हणाले की, “तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला आहेत. त्याना आव्हान देऊ शकत नाही आणि आजची ते रिजल्ट देत आहेत. मी कधीही भेदभावाचा समना केला नाही. मला तर करिअरच्या सुरुवातीलाच नाव बदण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र मी माझं नाव बदललं नाही.” असं ते म्हणाले.

चित्रपटाच्या या कामाची तुलना शहा यांनी थेट नाझी जर्मनीसोबत केली आहे. नसीरूद्दीन शहा म्हणाले की, जे उत्तम सिनेमा निर्मिती करतात अशा चित्रपट निर्मात्यांना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा तयार करण्यासाठी सांगितलं जातं.

उत्तम सिनेनिर्मिती करणाऱ्या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितलं जायचं. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नसला तरी सध्या ज्या प्रकारेचे मोठे सिनेमा येत आहेत यावरून आपण अंदाज घेऊ शकतो.

या कामाची तुलना नसूरुद्दीन शाह यांनी नाझी जर्मनीसोबत केली. नाझी जर्मनीमध्ये असं होत होतं असं नसूरुद्दीन शहा म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या विधानानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
महीलेने कारल्याचा ज्युस पिऊन तब्बल ४० किलो वजन घटवले; लोकांच्या टोमण्यांनी झालती हैराण 
“बचपन का प्यार” गाणे म्हणत १३ महाभाग बसले एका दुचाकीवर, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी धरले धारेवर
पैसा जाताच पोटच्या पोरीचीही माया आटली! राणू मंडलला वाऱ्यावर सोडून पोरगी फरार 
“बचपन का प्यार” गाणे म्हणत १३ महाभाग बसले एका दुचाकीवर, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी धरले धारेवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.