सरकारी, खाजगी नोकरी शोधताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी, नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या..

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना जॉब मिळत नाहीत. असे असताना आता सरकारी आणि खाजगी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पुढच्या काही दिवसांत या दोन्ही क्षेत्रात नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे आपला फायदा होऊ शकतो.

यामध्ये जायन्ट टेक आणि अ‍ॅमेझॉन या खासगी कंपन्यामंध्ये ५५००० रुपयांपर्यंत मासिक पगार असणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते.

यामध्ये द छत्तीसगड पब्लीक सर्व्हिस कमिशनने प्राध्यापकांच्या ५९५ जागांसाठी भरती होणार आहे इच्छुकांनी १३ सप्टेंबरपासून psc.cg.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा. यासाठी पी. एच. डी आणि १० वर्ष शिकवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामुळे ही एक मोठी संधी आहे.

तसेच द सिक्किम पब्लिक सर्व्हिस कमिशन ब्लॉक ऑफिसर या पदासाठी भरती घेणार आहे. यासाठी ११ जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.spscskm.gov.in. वर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करावा. तसेच राजस्थान सबऑर्डिनेट मिनीस्ट्रीअल सर्व्हिस सलेक्शन बोर्डात २५० रिक्त जागांसाठी नोकर भरती होणार आहे.

यासाठी rsmssb.rajasthan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज करावा. उमेदवार ८ ऑक्टोबरला अर्ज करु शकतात. यासाठी गणित, अर्थशास्त्र किंवा कम्युटर क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पद्विधारक असणे आवश्यक आहे. तसेच द डिफेन्स रिसर्च डेव्हलपनेंट ऑर्गनायझेशनने जुनियर रिसर्च फेलो पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज मागितले आहेत.

१८ आणि १९ ऑक्टोबरला यासाठी मुलाखती होणार आहेत. या मुलाखतीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना सुरुवातील २ वर्षांसाठी रुजु केले जाईल. या पदासाठी इच्छुक उमेदवार [email protected] या संकेत स्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज करु शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.