महाराष्ट्र सरकार पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधे मोफत वाटनार

मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी तसेच प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे ५ कोटी जनतेस मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले आहेत. असे हसन मुश्रीफ या यांनी सांगितले आहे.

मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे, कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. असे निर्देश देण्यात आले आहेत.

आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला पुरवावे. या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल.

तसेच, खर्च भागवून उरलेली रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे. असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.