सुवर्ण संधी! सरकारने पोलीस भरतीवरील निर्बंध हटविले, ‘इतक्या’ रिक्त पदांसाठी होणार मेगा पोलीस भरती

मुंबई | राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले होते. या निर्बंधातून पोलीस पदांच्या भरतीला सूट देण्यात आली आहे. गुरुवारी २१ जानेवारीला प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन जीआर अनुसार एकूण १२,५२८ पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आहे.

 

कोरोना माहामारी आणि लॉकडाऊन काळात राज्याच्या विविध आर्थिक स्रोतांवर गंभीर परिणाम झाला. यामुळे ४ मे २०२० रोजी वित्त विभागाने गरजेच्या असणाऱ्या आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य सर्व विभागातील पदभरतीवर निर्बंध घातले होते.

 

दरम्यान, गुरुवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार गृह विभागाला पोलीस भरतीसाठी सूट देण्यात आली आहे. यासाठी १३ नोहेंबर २०२० च्या बैठकीत पोलीस शिपायांच्या २०१९ मधील ५२९७ रिक्त पदे तसेच २०२० वर्षातील ६७२६ पदे आणि मीरा-भाईंदर आयुक्तालयासाठी ५०५ पदे अशी एकूण १२५२८ पदे भरण्यात येणार आहेत.

 

सध्या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच अनेक तरुण हे रोजगाराच्या शोधात आहेत. यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकप्रकारे दिलासा देणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
तृतीयपंथीयांना मिळणार पोलिस दलात नोकरी; ‘या’ राज्यातील सरकारचा महत्त्वाचा निर्णय
अजित पवारांनी दिले राज्यात १० हजार जागांसाठी पोलीस भरती करण्याचे निर्देश
धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.