काय सांगता! पाचवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या..

मुंबई । देशात सध्या कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकजण आता नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे.

यामध्ये ज्वाइंट रिक्रूटमेंट बोर्ड त्रिपुराने अधिकृत जाहिरात जारी केली असून मल्टी टास्किंगच्या (MTS) रिक्त २,५०० पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात संपूर्ण माहिती डॉयरेक्‍ट्रेट ऑफ एम्‍प्‍लॉयमेंट सर्व्हिसेस अँड मॅनपॉवर प्लॅनिंग (DESMP) त्रिपुराच्या अधिकृत वेबसाइट employment.tripura.gov.in वर देण्यात आली आहे.

यावर जाणून घेऊन इच्छुक उमेदवार पात्रता, अर्ज फी आणि निवडीशी संबंधित इतर माहिती घेऊ शकतात. यामुळे ही एक मोठी संधी आपल्यासाठी चालून आली आहे. तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेत नॉन-टेक्निकल, ग्रुप डी कॅटगरीतील मल्टी टास्किंग पदासांठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. एकूण २,५०० पदे भरती करायची आहेत. या पदांवरील भरतीसाठी अनारक्षित कॅटगरीतील आठवी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अनुसूचित जाती / जमाती / पीएच कॅटगरीतील पाचवी पास उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ४१ वर्षे असावे. मात्र, राखीव कॅटगरीतली उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयात ५ वर्षे सवलत देण्याची तरतूद आहे. त्रिपुरा स्टेट पे मॅट्रिक्स २०१८ च्या आधारे उमेदवारांना चांगला पगार आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज २८ डिसेंबरपासून सुरू होतील आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२१ आहे. अनारक्षित कॅटगरीच्या उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल, राखीव उमेदवारांसाठी १५० रुपये भरावे लागणार आहेत. पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.