खुशखबरः! सरकारकडून मिळणार १५ लाख… जाणून घ्या नेमकी काय आहे योजना

आजकालच्या धावपळीच्या जीवनात पैसे कमवण्याच्या शर्यतीत माणूस गुरफटून गेला आहे. अश्यातच महागाईचे अदृश्य चटके, काम करत राहायचे आणि पगार झाले की ईएमआय, अमुक भाडे, तमुक कर भरायचे आणि उरलेल्या २-४ पैश्यात जीवनाचा गाडा हाकत राहायचा. या सगळ्यात बँक बॅलन्स ५ अंकांच्यावर नेता नेता भल्या भल्यांच्या नाकी नऊ येतात.

भविष्यात येणा-या आडीअडचणींसाठी प्रत्येकाला पैसे वाचवून ठेवण्याची गरज असते. पैश्यांच्या बचतीशिवाय संकटांना सामोरे जाणे खूप कठीण असते. अशाच एका बचत योजनेबद्दल जाणून घेऊया..पब्लिक प्रोविडेंट फंड या योजने अंतर्गत आपण १५ लाख रुपये मिळवू शकतो.

पब्लिक प्रोविडेंट फंड ( PPF ) ही एक अशी योजना आहे जी हमखास परतावा सुनिश्चित करते. जर तुम्हाला भविष्यासाठी PPF मध्ये गुंतवणूक सुरु करायची असेल तर दरमहा ५०० रुपयांपासून याची सुरुवात करू शकतो. पब्लिक प्रोविडेंट फंड ७. १ टक्के व्याज दर देते.

जर तुम्हाला पब्लिक प्रोविडेंट फंड सुरु करायचा असेल तर दरमहा ५०० रुपयांपासून सुरुवात करू शकता. १५ लाख रुपयांसाठी तुम्हाला दरमहा ५ हजार रुपये म्हणजेच वर्षभरात ६० हजार गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक योजना १५ वर्षांसाठी आहे.

जेव्हा या योजनेचा कालावधी संपेल तेव्हा तुम्हाला ९ लाख रुपये मुद्दल आणि ६ लाख ७७ हजार रुपये व्याज मिळेल. म्हणजे एकुण १५ लाख ७८ हजार रुपये मिळतील. भारत सरकार लोकांमध्ये बचतीला प्रोत्सहन देण्यासाठी ही योजना चालवते. १५ वर्षांचा कालावधी असेलली ही योजना सुरक्षित गुंतवणूक आहे.

या योजने अंतर्गत जर आपण आजारी असल्यास किंवा इतर आणीबाणीच्या काळात तुम्ही ५ वर्षांनंतर काही रक्कम काढू शकता. पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत देखील गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे तुम्हाला 15 वर्षांनंतर मिळणारी रक्कम देखील मोठी असेल. तसेच आपण आपले मासिक हप्ते नियमित भरत रहावे याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही एक वर्षासाठी PPF मध्ये मासिक हफ्ते दिले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते.

 

महत्वाच्या बातम्या
गेहना वशिष्ठ टॉपलेस फोटोमुळे झाली ट्रोल, चाहते म्हणाले, राज कुंद्राचे शूट होते का? 
पाऊस कधी, किती पडणार? अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या..
काय सांगता! कियारा अडवाणीची डुप्लिकेट आहे तिच्यापेक्षा सुंदर? फोटो पाहून विश्र्वासच बसणार नाही
दान करताना फोटो काढणाऱ्या सेलिब्रिटींवर रोहित शेट्टी भडकला; म्हणाला फोटोग्राफर्सना फोन करून बोलावल्याशिवाय…..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.