सरकार देणार इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर ३० हजार तर चारचाकी खरेदीवर १ लाख ५० हजारांचे अनुदान

नवी दिल्ली | देशात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणाबाबत बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

दरम्यान, ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिल्यानंतर अनेक ऑटो कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन लाँच करत आहेत. तसेच सरकारी योजनेच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात वाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी भुमिका असणार आहे.

देशाची राजधानी दिल्ली लवकरच प्रदुषणमुक्त होण्यासाठी दिल्ली सरकार नवे पाऊले टाकले आहे. यामध्ये सरकारकडून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीसाठी ३० हजार रुपये आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्ज घेऊन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्य़ांसाठी व्याजदरात पाच टक्के सूट देण्यात येणार आहे.

राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या पायभूत सुविधा मजबूत करण्यासाठी दर ३ किलोमीटरनंतर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करुन देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत ७० चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहेत. तर आणखी १०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू आहे.

देशातील दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीदाराचे हजारो रुपये वाचणार आहेत. तसेच खिशावरील पेट्रोल-डिझेल खर्चचा भार बंद होणार आहे. दिल्ली सरकारच्या हा निर्णय कौतुकास्पद आहे. देशातील इतर राज्या सरकारांनी अशाप्रकारचे निर्णय घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? वाचून थक्क व्हाल
दमदार आणि आकर्षक लूकमध्ये महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत आहे फक्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.