सरकार मृतांचा आकडा लपवतय, वास्तव परिस्थीती भयानक; निर्मला सीतारामनच्या पतीची मोदींवर टीका

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कोरोनामुळे देशात हाहाकार उडाला आहे. यामुळे अनेकदा भाजप नेतेच मोदींवर टीका करताना दिसत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी.

तसे न होता केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे. यामुळे आता विरोधक देखील मोदींवर टीका करत आहेत.

तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला धोरणात्मक सल्ला दिला होता. पण एका केंद्रीय मंत्र्याने तो असभ्य भाषेत धुडकावून लावला. तसेच त्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे.

देशभरात पंतप्रधान प्रचारसभा घेत आहेत, गर्दी जमवत आहेत. कुंभमेळा सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर या सगळ्यांना जाग येते. हे सर्व फार धक्कादायक असल्याचे परकला प्रभाकर यांनी सांगितले.

लोकांनी साठवलेले पैसेही संपत आहेत. आर्थिक नुकसानानंतर अनेक लोक पुन्हा उभे राहू शकत नाहीत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १.८० लाख लोकांचा जीव गेला आहे. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

परकला प्रभाकर हे एक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी देशाच्या अर्थमंत्री आहेत. यामुळे आता मोदी सरकारवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे चर्चा रंगू लागली आहे. विरोधकही आता आक्रमक झाले आहेत.

ताज्या बातम्या

प्रेमात धोका मिळाल्यामूळे आजही अविवाहीत आहेत बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते

जडेज्याने एकाच ओव्हरमध्ये ३७ धावा ठोकत आरसीबीला कुटले, तीन बळी घेत सामनाही जिंकवला

कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.