बाईक चालकांसाठी सरकारने बदलले नियम; जाणून घ्या महत्वाचे ५ नियम

भारतात रस्ते अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातले अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता सुरक्षेसाठी या गोष्टींचे पालन सगळ्यांनी करावे असेआवाहनही करण्यात आले आहे. बाईक चालविणाऱ्यांसाठी आणि मागे बसणाऱ्यांसाठी हे नवे नियम असणार आहेत.

रस्ते वाहतून मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमानुसार बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचे आहे. सध्या बहुतेक गाड्यांना अशी सुविधा नसते. त्याच बरोबर दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात.

बाईकवर आता मागे कंटेनरही लावता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा जास्त नसावी. अशा प्रकारचे कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही.

तसेच 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.

सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचे पालन नव्या गाड्या तयार करतांना करावे लागणार आहे.

इलेक्ट्रिक कारची विक्री आणि उत्पादन आणखी वाढावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक वाहनांना आता एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्याच बरोबर बीएस-6 वाहनांसाठी नंबर प्लेटवर नवीन रंग आणि स्टिकर असणार आहे.

आता यापुढे इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेटही वेगळ्या रंगाची असणार आहे. या गाड्यांची नंबर प्लेट हिरव्या रंगात असणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी. असे आहेत नवीन नियम.

महत्वाच्या बातम्या-

थेट ऊसाच्या फडातून सुप्रीया सुळेंच्या लेकीची राजकारणाच्या मैदानात धमाकेदार एंट्री

दिशाच्या मृत्यूची बातमी ऐकताच सुशांत बेशुद्ध पडला आणि…; सिद्धार्थ पिठाणीचा गौप्यस्फोट

पूजा भट्टने ड्रग्स घेण्यामागचे सांगितले ‘हे’ विचित्र कारण; सोशल मिडीयावर ट्रोल

दिशाच्या मृत्यूची बातमी ऐकताच सुशांत बेशुद्ध पडला आणि…; सिद्धार्थ पिठाणीचा गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.