सरकार दिलेले सल्ले मानत नाही; मोदी सरकारवर गंभीर आरोप करत कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा

नवी दिल्ली । देशात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आली नाही. अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. देशात जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आले होती. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती.

यामध्ये कोरोना विषाणूवर अभ्यास केला जात होता. यामध्ये शाहिद जामील यांचा समावेश होता. ते यामध्ये प्रमुख म्हणून काम करत होते. भारतामधील कोरोना विषाणूंच्या रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा गट स्थापन करण्यात आला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी राजीनामा दिला आहे.

मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक विषयांवरुन जामील यांची मत वेगळी होती. ते सरकारच्या धोरणांवर सडेतोड शब्दांमध्ये टीका करत होते. यामुळे त्यांचे केंद्र सरकारसोबत पटत नव्हते.

यावर जामील म्हणाले, सरकारी यंत्रणांना कोरोना जानेवारीमध्ये संपला आहे असे वाटले, आणि त्या बेजबाबदार झाल्या. त्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेल्या अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केली. यावरून देखील त्यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली.

निवृत्त डॉक्टर यांची मदत घेऊन ऑक्सिजन बेड, औषधे याचा योग्य प्रकारे पुरवठा केला पाहिजे. पुरवठा साखळी मजबूत केली पाहिजे. देशात कोरोना नियंत्रणाबाहेर गेलाय, त्यावर उपाययोजना करा, असे अनेक सल्ले त्यांनी मोदी सरकारला दिले होते. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. कोरोनावर त्यांचा मोठा अभ्यास असून याकाळात त्यांनी चांगले काम केले आहे. कोरोनावर ते ठामपणे मत मांडत होते. कोरोनावर काम करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका त्यांनी अनेकदा केली आहे.

ताज्या बातम्या

माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन, इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने सुनावले

अजबच! आता कोरोनावर दारू ठरतेय प्रभावी, ‘या’ डॉक्टरने केला विचीत्र दावा

प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.