या नागरीकांना मिळणार नाही कोरोना लसीचा दुसरा डोस; सरकार लसीकरणाची रणनिती बदलण्याची शक्यता

देशभरा कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह भेटत आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी देशात लसीकरणही सुरु आहे.

आता १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरीकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लोकांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी त्यांना कोरोनाचे दोन डोस दिले जात आहे. कोरोना लसीकरणाबाबत सरकार आपली रणनिती बदलणार असल्याचे समोर येत आहे.

एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना दोन वेळा कोरोना लसीचा डोस देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा एकच डोस पुरेसा असेल, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्युट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोक संक्रमित होत आहे. त्यामुळे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पण इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे केले जाईल, अशा प्रश्न अनेकांना पडला होता, पण आता नवीन संशोधनातून मिळालेल्या माहितीतून सरकार कोरोना लसीची रणनिती बदलणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठकीत कॅबिने मंत्र्यांसह राज्यमंत्रीही सहभागी होणार आहे. ही बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या बैठकीत विविध राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, देशभरात झपाट्याने कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ८६ हजार ४५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

वा रं मर्दा! अभिनेता रुग्णवाहिका चालवून रुग्णांची करतोय सेवा; दिवसरात्र करतोय रुग्णांची मदत
प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन; कोरोनाच्या उपचारादरम्यान आला हृदविकाराचा झटका
धक्कादायक! कोरोना रुग्णाला फक्त २५ किलोमीटर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालाकाने घेतले ४२ हजार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.