इंडिअन आयडल १२: पवनदीप, अरुणीता, षण्मुखप्रिया यांना मिळाले २० गाण्यांचे कॉन्ट्रेक्ट; ट्रॉफी जिंकण्याआधीच लागली लॉट्री..

‘इंडिअन आयडल १२’ शो सध्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. जिथे यावेळी प्रत्येक स्पर्धक इंडियन आयडॉलचा विजेता होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. जरी या शोमध्ये फक्त एकच स्पर्धक असेल जो या शोची ट्रॉफी जिंकेल, परंतु शोचे तीन स्पर्धक पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल आणि शानमुखप्रिया यांना अशी सुवर्ण संधी मिळाली आहे. ज्यानंतर यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही कारण ते आता २० गाणी गाणार आहे.

क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोड्यूसर राज सुराणी यांनी त्यांच्या ‘मंजिलो’ या म्युझिक अल्बममध्ये ६ स्पर्धकांना सोबत घेतले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात टॉप इंडियन आयडल स्पर्धक गायनासह डान्स देखील करणार आहेत.

चाहत्यांना त्यांचे गाणे खूप आवडत आहे आणि या गाण्याला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी पवनदीप, अरुणिता, षण्मुखप्रिया यांना आणखी २० गाण्यांसाठी साइन केले आहे. चाहत्यांना उत्सुकता आहे की आता या तिघांकडून कोण-कोणत्या नवीन गाण्यांचा आनंद घ्यायला मिळणार आहे.

Indian Idol 12: Raj Surani Signs Pawandeep Rajan, Arunita Kanjilal And Shanmukha Priya For 20 Songs - Filmibeat

राज सुरानी यांनी सांगितले की, पवनदीपच्या आवाजाने ते खूप प्रभावित झाले आहे. त्यांच्यापैकी कोण विजेता बनेल किव्हा नाही त्यांना काहीही काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी हे तिघे विजेते आहेत. खरतर हे टॉप ६ असलेले स्पर्धक सगळ्यांसाठीच विजेते आहेत.

Indian Idol 12 : पवनदीप, अरुणिता और शण्मुखप्रिया को मिला 20 गानों का कॉन्ट्रेक्ट, शो जीतने से पहले लगी लॉटरी | Indian idol 12 contestants pawandeep arunita shanmukhpriya wins 20 ...

दुसरीकडे अरुणिताबद्दल बोलले की तिच्या आवाजात अशी जादू आहे जी सर्वांना आकर्षित करते. त्यामुळे ती या दोन गायकांसोबत एका प्रोजेक्टवर काम करणार आहे. ज्यावर काम सुरू झाले आहे आणि त्याचे चित्रीकरण हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये केले जाईल.

Indian Idol 12: Raj Surani Signs Pawandeep Rajan, Arunita Kanjilal And Shanmukha Priya For 20 Songs - Courtesy Feed

प्रोड्यूसर राज सुराणी यांना विश्वास आहे की चाहत्यांनाही या दोघांना एकत्र पाहायला आवडेल. तसेच ते षण्मुखप्रियासोबत काही रॉकिंग गाण्यांवर काम करणार, जो रॉकिंग परफॉर्मन्सने स्टेजवर धमाका करेल. राज यांनी सांगितले की केवळ आम्हीच नाही तर हे तीन स्पर्धक देखील या गाण्यांसाठी उत्सुक आहेत.

त्यांना आशा आहे की या तिघांचे चाहते आतापर्यंत त्यांच्या गायनाला प्रेम देत आहेत, तसेच पुढे देखील त्यांच्या प्रेमाने तिघांना प्रोत्साहन देत राहतील. महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन आयडॉल १२ चा शेवट एपिसोड १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या हंगामाचा शेवट खूप खास असणार आहे. काही खास पाहुणेही फिनालेमध्ये दिसणार आहेत.पण, यंदा इंडियन आयडॉलचा विजेता कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा-

वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही 11 महीन्यांच्या वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी

पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.