कार्यकर्त्यांचा चांदीच्या चपला, पॅशन बाईक देऊन केला सन्मान; पडळकरांच्या डोळ्यात अश्रू

मुंबई | गोपीचंद पडळकर आमदार होणार नाही, तोपर्यंत चपला घालणार नाही, असा निर्धार २००६ मध्ये निश्चिय दत्तात्रय कटरे यांनी केला. तेव्हापासून त्यांनी पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी २००९ पासून चपला घातलेल्या नव्हत्या.

या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला आहे. याशिवाय एका कार्यकर्त्याच्या वारसाला गाडी भेट देण्यात आली. या सत्कार सोहळ्यात पडळकर यांना अश्रु अनावर झाले. याचबरोबर पडळकर आमदार होईपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, असा पण २००९ मध्ये करणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांनादेखील पॅशन गाडी आणि चांदीची चप्पल देण्यात आली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला पडळकर यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर गोरे यांचं भाषण सुरू असताना पडळकर यांना अश्रू अनावर झाले.

वाचा गोपीचंद पडळकरांचा राजकीय प्रवास…
गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाला सुरुवात महादेव जाणकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून झाली. धनगर समाजातूनच येणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी २००९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. पण बारामतीमध्ये अजित पवारांविरुद्ध लढताना त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. यानंतर भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं.

महत्त्वाच्या बातम्या
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो पाहिलात का? पहा फोटो
प्रेग्नेंसीनंतरचा सपना चौधरीच्या डान्सचा ‘तो’ खतरनाक एकदा व्हिडीओ पहाच..
आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल; शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.