Share

“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका

gopichnd-padalkar.j

गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. पंजाब(Punjab) वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. गोव्यात देखील भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली आहे. यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांनी ‘युपी तो झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या होत्या.(gopichand padalkar statement on mahvikas aghdi gaovernment)

भाजप आमदारांच्या या घोषणांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, “युपी आणि इतर राज्यातील निकालांमुळे महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही दिवस थांबावं लागेल.” आता या वक्तव्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

‘देवेंद्रजी दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात’, असं वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. एका मुलाखतीत शरद पवारांबद्दल बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तर ते मीचं केलं. माझ्यापेक्षा कोण पुढं जाता कामा नये, असं शरद पवारांना वाटतं.”

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, “माननीय देवेंद्रजी असे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवारांपेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचं आहे. विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका जी शरदचंद्र पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्यापुढचं नेतृत्व करण्याची क्षमता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.”

यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “आपला कोंबडा आरवल्याशिवाय दिवस उगवत नाही, असे काही कोंबड्यांना वाटते. असेच लोक एकत्र येऊन पंतप्रधानांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत.”

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, “उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही. असे कितीही लोक एकत्र आले तर फरक पडणार नाही. हे पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.”

महत्वाच्या बातम्या :-
ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..
‘या’ पाच अभिनेत्रींंसोबत जोडले गेले होते श्रीसंतचे नाव, पाच नंबरवालीचं नाव वाचाल तर अवाक व्हाल
‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now