‘पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का?’

मुंबई | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची इतकी दखल घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते.

अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होते. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

यावर प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का, असा संतप्त सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला. शनिवारी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, ‘अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा २,१५,९१३ मतांनी पराभव केला होता. याचाच धागा पडळकर यांनी अजित पवार यांना उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गाईच्या दूध खरेदी दरात वाढ
व्हा अधिक स्मार्ट! मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर
‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.