‘बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाले, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होतील’

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आवताडेंच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ‘बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. मला चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदार केलं,’ असे पडळकर यांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘बारामतीत माझं डिपॉझिट जप्त झालं. पण माझी आमदार होण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच मला आमदारकी मिळाली. पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचीही तशीच इच्छा आहे. त्यांनाही आमदार व्हायचं आहे. मला खात्री आहे, पंढरपूरच्या या भूमीत यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल.’

दरम्यान, ‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे.

ज्यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा,” असे पडळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

..आणि धाडसी अंगरक्षकाने पोलिस अधिक्षकांवरचा तलवारीचा वार स्वत:वर झेलला

..म्हणून राजेश खन्नाने स्वतःचे चित्रपट पाहणे बंद केले होते

घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव मोदी सरकारनं फेटाळला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.