सगळं लोकांनीच करावं, मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबूक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?

मुंबई: कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा खोचक सवाल करत, मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाऊनविषयी जनतेत भिती पसरवू नये, अशी टिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हि टिका केली आहे.

व्हिडीओत ते म्हणतात  मुख्यमंत्री महोदय, काल रात्रीच फेसबुक लाईव्ह नेमकं कश्यासाठी होत ?
मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. यानं सामान्य जनतेत काय संदेश जातोय? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच काम सरकारनं करु नये.

इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे.. आणि तुम्ही कसला हा लॉकडाऊन – लॉकडाऊन काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही? एक वर्ष झालं तरी तेच तेच पाल्हाळिक बोलताय. कोरोनाचा प्रसार तुम्हाला रोखता आला नाही. हे आतातरी स्पष्टपणे कबूल करा.

लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय करोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा.

बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनचं रोखाव किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबूक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालायत का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं.

सरकारचं सगळं पाप जनतेच्या माथी मारून जनतेलाच ‘बेदरकार’ म्हणायचं, राज्याचे प्रश्न सोडून बंगालमध्ये ममता दिदिनं लावलेल्या ‘दिव्याचं’ कौतुक करायचं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेल्या अंधारकडं सोयीस्कर दुर्लक्ष करायचं, असं उठसुठ सामनाच्या अग्रलेखातून बरळणाच्या उद्योग सुरू आहे.

अशा कडक शब्दांत गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकारला धारेवर धरलय.

महत्वाच्या बातम्या
लॉकडाऊनपुर्वी बाकीच्या देशांनी जनतेला पॅकेज जाहीर केलय, तुम्हीही करा- फडणवीस
‘टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे’
पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.