“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता करेक्ट कार्यक्रम कोणी केला?”

आजचा दिवस निवडणुकींच्या निकालाचा दिवस होता. अवघ्या पुर्ण महाराष्ट्र राज्याचे  लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपच्या कारकर्त्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली.

भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे आणि महाविकास आघाडीच्या भागीरथ भालके यांचा पराभव निश्चित झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आधीच आपले निकष लावले होते आणि सांगितले होते की समाधान आवताडे यांचा सात हजार मतांनी विजय झाला आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे पुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. जरी या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण १९ उमेद्वार या निवडणूकीत उभे राहिले होते.

पण सगळ्यांचे लक्ष दोनच उमेदवारांवर होते भारत भालके आणि समाधान आवताडे. भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्यांना या गोष्टीचा मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

पण त्याच्याउलट आवताडेंनी मोठी आघाडी मिळवली आणि त्यांचा विजयही झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण अनेक दिग्गज नेत्यांनी भालकेंच्या प्रचारासाठी मेहनत घेतली होती. भाजपच्या या विजयानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

ते म्हणाले आहेत की, पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय जाळ नाही. सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम? नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जय मल्हार. असा खोचक टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे आणि आवताडेंचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या
सोनू सूदने टेकले आरोग्य व्यवस्थेपुढे गुडघे;रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी त्यालाही बघावी लागली वाट
आई मरेल हो…, १७ वर्षाचा मुलगा रडत राहिला; पोलिसांनी VIP साठी ऑक्सिजन सिलेंडर हिसकावला; पहा व्हिडिओ
स्पर्धेपुर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फाॅर्मही हरपला; अखेर वादळ आलेच; मैदानातूनच बापाला केले नमन
फळांचा राजा आंबा; जाणून घ्या आंब्यापासून आइस्क्रीम बनवण्याची सोपी पद्धत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.