भारतनानांना शांती मिळवून द्यायची असेल तर त्यांच्या पुत्राविरोधात मतदान करा; पडळकरांचे अजब तर्कट

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे.

ज्यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा,” असे पडळकर म्हणाले.

‘बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. मला चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदार केलं,’ असे पडळकर यांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘बारामतीत माझं डिपॉझिट जप्त झालं. पण माझी आमदार होण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच मला आमदारकी मिळाली. पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचीही तशीच इच्छा आहे. त्यांनाही आमदार व्हायचं आहे. मला खात्री आहे, पंढरपूरच्या या भूमीत यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल.’

महत्त्वाच्या बातम्या 

‘होय माझी चूक झाली, पण नियम मोडणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई करा’

८ तासांच्या चौकशीनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक; ३ एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी

“…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंनी दिला राज्यातील जनतेला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.