‘शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याने आहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावू नये म्हणून…’

मुंबई | जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  यांच्या पुतळा अनावरणावरुन आज पहाटे गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होते.

मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली.

याचबरोबर यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचे पडळकर यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचेही यावेळी बोलताना पडळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?
मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल
“पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.