‘औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद’

हिंदुत्ववाद या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनामध्ये तुफान टोलेबाजी सुरू आहे. काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ा आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

“भारतीय जनता पक्षात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू केले आहे. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांत काश्मीर खोऱ्यातील २२० हिंदू-शीख कुटुंबांनी जम्मूतील निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही, असं राऊतांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हंटल आहे.

सामनातील अग्रलेखातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात पण तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता,” असा टोला पडळकर यांनी राऊतांना लगावला आहे.

इतर विषयांवर लिहिताना तुमच्या हाताला लकवा मारतो का?, असा सवाल पडळकरांनी राऊतांना विचारलाय “जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल.

ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते त्यावेळेसे ऐरवी उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?”

“तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असंच दिसतंय,” असं देखील पडळकर म्हणाले आहेत.“तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. त्यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?,” असा खोचक सवाल पडळकरांनी विचारला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
अखेर १९ दिवसांनंतर आर्यनच्या दिनक्रमात झालाय बदल, जेलमधील आरतीला सहभागी होतो आणि..
आर्यन नीट जेवत नाही, बॅरेकमध्ये रडत बसतो, वॉशरूमलाही जात नाही, जेल स्टाफला त्याची चिंता
वाऱ्याची झुळूक आली अन् नको तेच दिसलं! जान्हवी कपूर झाली Oops मोमेंटची शिकार; पहा व्हिडिओ…
अभिनेत्याने १३ वर्षांपुर्वी मारली होती जेनेलियाला थप्पड, अखेर रितेशने बदला घेतलाच; दणादण पंच मारत केले घायाळ..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.