“राष्ट्रवादी हुशार, गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात, ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला”

 

पंढरपुर पोट निवडणूकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे भाजप नेते गोपीचंद पडळकर मंगळवेढ्यात प्रचार सभा घेत आहे. आता यावेळी गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीने गोरगरीबांच्या घरावर नांगर फिरवला आहे. ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे.

मेंढ्यांचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसते. आजपर्यंत राष्ट्रवादीने गोरगरीब बहुजन समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला आहे, अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रवादी खुप हुशार आहे. त्यामुळेच गृहमंत्री नेहमी गरीब तोंडाचा पाहतात, ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी व्यवस्था आहे, असा घणाघातही पडळकरांनी पवारांवर केला आहे.

या प्रचारसभेत विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. त्यावेळी, मुंबईत घरपोच दारू देतात. मग गोरगरीब जनतेला घरपोच धान्य आणि भाजीपाला द्यायला काय हरकत आहे, असे म्हणत प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंढरपुरचे आमदार भारत नाना भालके यांचे २८ नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झाले होते, आता त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणूकीचे मतदान १७ एप्रिलला होणार आहे, तर २ मेला मतमोजणी होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीत मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

गाडी साफ करण्यासाठी एकाला डस्टर चोरताना पाहिले आणि त्याला सुचली ही भन्नाट आयडिया

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, डबेवाल्यांनाही आर्थिक मदत द्या; आता काॅंग्रेसचीच मागणी

कोण आहे शुभम शेळके, ज्याला जिंकवण्यासाठी संजय राऊत, तर हरवण्यासाठी फडणवीस जीवाचं रान करतायत?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.