हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेचा रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या वतीने इस्लामपूरमध्ये निषेध करण्यात आला.

आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत हिंसा घडवणा-यांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी यावेळी आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली.

तसेच यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. हिंसक आंदोलनामागे डावे पक्ष आणि काँग्रेसचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही,’ अशी शक्यता वर्तवत पडळकर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

दरम्यान, ‘कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेऊ नयेत. दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, मोदी सरकारच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी,’ अशी मागणी ही पडळकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.