तुम्ही ‘गुगल पे’द्वारे पैशांचा व्यवहार करताय? बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची…

मुंबई | ‘गुगल पे’द्वारे पैशांचा व्यवहार करणार्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. याचे कारण असे की आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीये. पुढील वर्षी जानेवारीपासून गुगल पे ने पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरुन मोफत पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा देत आहे. मात्र, याबाबत 9to5Google ने दिलेल्या वृत्तानुसार, गुगलकडून नोटीस जारी करुन WEB APP बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता युजर्सना फटका बसणार आहे.

तसेच गेल्या आठवड्यात गुगलकडून अनेक नवनवीन फिचर्स जारी करण्यात आलेत. याचबरोबर ते सर्व फीचर अमेरिकी अँड्रॉइड आणि iOS युजरसाठी रोलआउट करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने Google Pay च्या ‘लोगो’मध्येही बदल केला आहे.

दरम्यान, पुढील वर्षी जानेवारीपासून गुगल पे ने पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल आहे. मात्र नेमके किती द्यावे लागण हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या
रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
संजय राऊतांची बोलतीच बंद झालीय; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमय्यांनी सुनावले
कोरोना लस गावागावात पोहचवण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना पाठवला ‘हा’ प्लान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.