Share

Google Map Accident : अरे देवा… गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय? पुलाखालचा रस्ता घेतला अन् गाडी खाडीत पडली, पुढे जे झाल ते भयंकर

Google Map Accident : आपल्या रोजच्या प्रवासात अनेकदा मदतीला येणाऱ्या गुगल मॅपने यावेळी चूक करून मोठा अनर्थ ओढवला. बेलापूर (Belapur) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेत एक महिला आपल्या कारसह थेट खाडीत कोसळली. हे सर्व घडलं फक्त गुगल मॅपवर दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिस (Coastal Security Police) वेळेत पोहोचले आणि त्या महिलेचे प्राण वाचवले.

नेमकी घटना कशी घडली?

शुक्रवारी पहाटे १ वाजता, एका महिलेनं आपल्या कारमधून उलवे (Ulwe)कडे प्रवास सुरू केला होता. मार्ग माहीत नसल्याने ती गुगल मॅपच्या साहाय्याने चालली होती. मात्र, मॅपवर रस्ता असल्याचं दाखवण्यात आल्यानं ती थेट बेलापूरच्या खाडीपुलाखालचा (Belapur Khadi underpass) मार्ग घेत गेला. प्रत्यक्षात, तो रस्ता पुढे जाऊन ध्रुवतारा जेट्टी (Dhruvatara Jetty) या ठिकाणी संपतो आणि जेट्टीवर कोणताही सुरक्षा कठडा नसल्याने गाडी थेट खाडीत पडली.

ही दुर्घटना अगदी सागरी सुरक्षा चौकी (Coastal Security Point) समोरच घडल्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ती आली. त्यांनी रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. नंतर क्रेनच्या सहाय्याने गाडी देखील बाहेर काढण्यात आली.

अपघातातून वाचलेल्या महिलेने पोलिसांना सांगितलं की, गुगल मॅपवर त्या ठिकाणी सरळ रस्ता दाखवण्यात आला होता, त्यामुळे पुढे जेट्टी असल्याची कल्पनाच आली नाही. मॅपवर विश्वास ठेवत ती पुढे गेली आणि हा भीषण अपघात घडला.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, गाडी खाडीतून बाहेर काढतानाचे दृश्य पाहून अनेकांनी गुगल मॅपवर अवलंबून राहण्याचा धोका अधोरेखित केला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now