गुड न्युज : आपली लाडकी गायिका कार्तिकी गायकवाडचं ठरलं…

 

मुंबई। आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. आपल्या गोड आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी क्युट गायिका कार्तिकी आता आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास तयार झाली आहे.

२६ जुलै रोजी रोनित पिसे या तरूणाशी तिचा साखरपुडा होणार आहे. ‘सारेगमप’ या संगीत रिअ‌ॅलिटी शो मधून कार्तिकी आपल्या आवाजाच्या जोरावर घराघरात पोहचली.

‘घागर घेऊन… घागर घेऊन’ या गवळणीने तर ती तुफान लोकप्रिय झाली. ते गाणं गाण्याची तिची ताल तो सूर आणि महत्वाचं म्हणजे तिच्या हावभावामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

या गवळणीने गायिका म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. मग मात्र तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
नुकताच तिचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.

रोनित हा पेशाने इंजिनिअर आहे तसेच त्यांचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड यांच्या मित्रपरिवातील पिसे कुटुंब आहे.

तसेच हा महत्त्वाचा निर्णय माझ्या बाबांनीच घेतला असल्याचे कार्तिकीने आवर्जून सांगितले आहे. २६ जुलैला साखरपुडा आहे मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरली नसल्याचे देखील कार्तिकीने सांगितले आहे.

तसेच तिच्या ‘सारेगमप’ मधल्या सहकारी गायक-गायिकांना ही बातमी सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाल्याचे देखील कार्तिकीने यावेळी सांगितले आहे.

रोनितला देखील संगीताची आवड आहे. तो फार छान तबला वाजवतो. त्याने तबल्याच्या ३ परीक्षा देखील पास केल्या आहेत. इथून पुढे आम्ही दोघे संगीताची आराधना सुरू ठेऊ, असे तिने यावेळी नमूद केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.